Saturday, July 24, 2010

Mahar Sanghtana

भक्त दामाजीपंत
फार वर्षांपूर्वी मंगळवेढा गावात दामाजीपंत नावाचे एक भाविकसद्गृहस्थ रहात होते. ते बिदरच्या सम्राटाच्या राजसभेत मोठ्या पदावरचाकरीला होते. सम्राटाची चाकरी प्रामाणिकपणे करण्याविषयी त्यांचा फारनावलौकिक होता. राजसभेचे कामकाज संपल्यानंतर उरलेला वेळ ते पांडुरंगाच्याभजन-पूजनात घालवत असत. एकदा राज्यात मोठा दुष्काळ पडला. गुरेढोरे चारा-पाण्याविनातडफडून मरू लागली. गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली. हे पाहूनदामाजीपंतांचे मन हेलावले. त्यांनी विचार केला की, सम्राटाची कोठारेधनधान्याने तुडुंब भरलेली असतांना प्रजेला भुकेने तडफडून मरू देणे योग्यनव्हे. म्हणून दामाजीपंतांनी आसपासच्या गावांत दवंडी पिटवून सांगितले की,सर्व लोकांनी सरकारी कोठारात येऊन आवश्यकतेपुरते धान्य न्यावे. लोकांनीदवंडी ऐकली. लोकांसाठी स्वत: दामाजीपंतांनी कोठाराचे द्वार खुले करूनदिले. लोकांच्या झुंडी धान्याच्या कोठाराकडे जाऊ लागल्या. सम्राटाला नविचारता दामाजीपंतांनी कोठारातील धान्य लोकांना वाटले, ही वार्तावाऱ्यासारखी पसरली. सम्राटाला हे समजताच त्याने आरक्षकांना आज्ञा दिलीकी, दामाजीपंतांना अटक करून राजसभेत आमच्यासमोर उपस्थित करा. इकडे हा सर्व प्रकार सर्वज्ञानी पांडुरंगाने जाणला आणि भक्ताचेसंकट निवारण्याकरिता त्याने एक युक्ती केली. पांडुरंगाने स्वत: महाराचेरूप घेतले. त्याने फाटकी वस्त्रे परिधान करून पाठीवर घोंगडे, हातात काठी,डोक्याला मुंडासे आणि त्यावर छोटी मोहरांची थैली, असा पेहराव केला अन् तोसम्राटाच्या राजसभेत उपस्थित झाला. त्यावर रूप पालटून आलेल्यापांडुरंगाला पाहून, 'तुम कौन हो, कहाँसे आए हो, तुमने सिरपर क्या लाया है?', असे एकाच वेळी अनेक प्रश्न सम्राटाने विचारले. त्यावर पांडुरंग आपलापरिचय करून देत म्हणाला, ''मी मंगळवेढ्याचा महार, विठू; दामाजीचा चाकर'',असे म्हणून त्याने डोक्यावरची थैली ओतायला प्रारंभ केला. पहाता पहातासुवर्णमोहरांचा मोठा ढीग सम्राटाच्या समोर पडला. हा चमत्कार पाहून सम्राटआणि राजसभेतील इतर सरदार यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. इकडेआरक्षकांनी दामाजीपंतांना कैद करून सम्राटापुढे उपस्थित केले; परंतुसम्राटाने दामाजीपंतांच्या हातकड्या काढायला सांगून त्यांना मोकळे केलेआणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हा सर्व प्रकार ऐकून दामाजीपंतांच्यालगेचच सर्व लक्षात आले. आपले संकट टाळण्याकरिता पांडुरंगाला महार होऊनआपल्या चाकराचे काम करावे लागले, याचे त्यांना फार वाईट वाटले. त्यांचाकंठ दाटून आला.

कर्नाटकमध्ये महार जातीतल्या मारी या पोटजातीच्या लोकांना शेती करण्याचा हक्क नाही. त्यांच्या सावलीचा स्पर्शही काहीजण निषिद्ध मानतात. उष्टं खरकटं आणि मेलेली जनावरं खाऊन ते पोट भरतात. चोमा महार याच पोटजातीतला आहे. कादंबरीचं मूळ नाव चोमन दुडी म्हणजे चोमाची डवरी. डवरी हे एक तालवाद्य आहे.

कैकाडी समाजाची दुःखद अवस्था
लोकांची घरे पडली तरी घराची जागा शिल्लक होती. शेतातील पीक वाहून गेले, तरी शेत शिल्लक होते, हे दोन्ही गेले तरी गावात पत शिल्लक होती. ज्यावेळी आम्ही काही मागणी करतो. एकदोन गुंठे जागा द्या असे म्हटले तर आम्हांला पत विचारतात. आमची पत कोठे आहे. आम्हांला गाव ना शिव. घर ना दार. एका गावात विमुक्त भटक्यांना दहा-बारा दिवसांपेक्षा अधिक काळ राहता येत नसे. आठ-दहा दिवस मुदत झाली की महार-रामोशी येत या गावाचे त्या गावाला नेऊन सोडत. विमुक्त जातीच्या लोकांना दाखले होते. त्यामुळे अधिक काळ एका गावात राहाता येत नसे. एखादा माणूस आजारी असला, मृत्यूशी झुंज देत असता तरी तशा अवस्थेमध्ये त्या माणसाला गाढवावर बसवून या गावचे त्या गावाला न्यावे लागे. जर त्या माणसाला रस्त्यात मृत्यू आला तर पुढील गावी नेल्यावर त्या प्रेताचे दफन किंवा जाळण्यास न देता आमच्या गावात पुरायचे नाही, पुरले की भूत होईल व आमच्या गावाला त्रास देईल म्हणून ते पुरू देत नसत. पुढील गावाला नेले तरी तीच तऱ्हा. तीन-चार दिवस प्रेत घेऊन फिरावे लागत असे. एखादी महिला बाळंत होत असेल, बाळंतपणाच्या वेदना सुरू असतील तेथे महार-रामोशी आले. चला येथील मुक्काम संपला पुढील गावी चला. त्या ठिकाणी बाई म्हणाली,`अरे बाबा, माझ्या मुलीला बाळंतपणाच्या वेदना सुरू आहेत, आजचा दिवस राहू द्या, तेव्हा महार-रामोशी म्हणत, अहो मावशी आम्ही कोण राहू देणार, गावकऱ्यांचा हुकूम आहे. तशाच अवस्थेमध्ये रस्त्यात ताणतणावामध्ये, हालअपेष्टेमुळे बाळबाळंतीण दोघांचे मृत्यू होत असे. मृत्यू झाल्यानंतर ते प्रेत दोनदोन, तीनतीन गावी घेऊन फिरावे लागे. एखाद्या वेळेला महार-रामोशीला दया आली तर खड्ड्यात पुरून टाकल्यावर पुढील गावाला गेल्यावर महार रामोशी परत जात. विमुक्त जातीचे कैकाडी लोक येथे येऊन उतरले त्यांच्याबरोबर एक प्रेत होते ते गावातील लोकांना समजल्यावर गावातील लोक तेथे येत. त्या लोकांना धामधूम मारहाण करून प्रेत कोठे आहे ते प्रेत परत उकरून एखाद्या गोधडीत बांधून गाढवावर घेऊन दुसऱ्या गावाला नेण्यास भाग पाडत.पुढील गावी गेले तरी तीच तऱ्हा. त्या प्रेताची दुर्गंधी सुटे. एखाद्या गावात एखादा वयस्कर माणूस दयाळू असेल तर तो म्हणत असे, ``अरे बाबा, हे दु:ख पाहावत नाही. तेव्हा असे करा ज्या बाजूला माणसांची वर्दळ नाही त्या ठिकाणी पुरून टाका. ते पुरल्यावर रामोश्यांना सांगा की, राळे घेवून जा आणि त्या बाजूला पेरा म्हणजे भूत झाले तरी गावात येणार नाही.'' अशी शिक्षा आम्ही हजारो वर्षे भोगली आहे.

गावरहाटीमधील ‘बारा-पाच’
मालवणी ही बोली भाषा कोकणातील ज्या भागात बोलली जाते त्या मालवणी मुलखातील ग्रामरचना, तेथील देवस्थाने, समाजरचना आणि पूर्वापार चालत आलेली एकूण जीवन पद्धती यांचा विचार, येथील गाव रहाटीमध्ये सामावलेला आहे. हा शब्द मालवणी बोलीत ‘गाव-हाटी’ असा उच्चारला जातो.
गावरहाटीच्या संदर्भातील पहिला महत्त्वाचा विषय म्हणजे ‘बारा-पाच’ होय. हा शब्दसमूह रहाटीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण रहाटी ही बारा पाचांचीच असते, इतरांचा प्रत्यक्षात त्यात समावेश बहुधा नसतो. त्यांच्या विचारानेच रहाटीमधील प्रत्येक गोष्ट कार्यान्वित होत असते.
त्यादृष्टीने संबंध गावाचा एक विचार म्हणजेच ‘बारा पाचाचे एक गणित’ करूनच गावगाडा चालता-फिरता ठेवावा लागत होता. त्याकाळी माणसे बहुधा शेती करूनच जगण्याचा प्रयत्न करीत होती. शेती हा त्यांचा जगण्याचा व्यवसाय होता आणि त्याला शाश्वती नव्हती.
गावरहाटीने त्यांना ती शाश्वती आणि स्थैर्य दिले. त्या प्रयत्नात सिंहाचा वाटा असलेल्या वतनदारांना त्यांचे धनीपण प्राप्त झाले.
शेतीच्या उद्योग व्यवसायात अनेकांचे सहकार्य लागते. त्यासाठी सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, तेली, परीट, कोष्टी, शिंपी, चांभार, सणगर, बुरूड, साळी अशा किमान बाराजणांची गरज असते. आपल्या भागत त्यांना ‘बलुतेदार’ असे म्हणतात, ही कुटुंबे शेती करू शकत नव्हती, त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्या गावातील शेतक-यांवरच पडलेली असे. अशा अवस्थेत त्या सर्वाना तो शेतकरी, शेतीमधून मिळालेल्या धान्याचा काही भाग, त्याच्या वेगवेगळ्या गरजा भागविणा-या हय़ा कुटुंबांना, देत असे त्याला बलुते असे म्हणत. त्यामुळे प्रत्यक्षात शेती न करता त्यांच्याही घरात धान्य येत असे. ही वस्तुविनिमय व्यवस्था (Barter System) गावरहाटीत अस्तित्वात होती!
गावरहाटीच्या संदर्भातील ‘बारा-पाचांमधील’ हय़ा बारा जाती!
गावरहाटीत पाच मानक-यांचा समावेश आहे. हय़ा मानक-यांमध्ये वतनदार म्हणून वेगवेगळय़ा काळात जी कुटुंबे हय़ा भागात आली; तेथील शेतकऱ्यांना ज्यांनी एकत्र आणून त्यांना परकीय आक्रमणापासून अभय दिले आणि त्यांच्याच सहकार्याने गावरहाटीची नवी समूहजीवन पद्धती रूढ केली, त्या वतनदारांना हय़ा ग्रामव्यवस्थेमध्ये ‘राजसत्ता’ सहजच प्राप्त झाली.
राजसत्तेच्या लोकांच्या कुलदैवतांसह, स्थानिक लोकांची जुनी ग्रामदैवते एकत्र आणली गेली आणि त्या सगळय़ा दैवतांना एकत्रितपणे रहाटीत सामील करून घेण्यात आले.
त्यानंतर प्रश्न आला तो त्या मंदिरांमधील देवदेवतांच्या दैनंदिन पूजापाठाचा आणि त्यामधील उत्सव व्यवस्थेचा. हय़ा व्यवस्थापनेचे बहुतेक अधिकार पूर्वी येथे वस्ती करून असलेल्या योग्य त्या लोकसमूहाला देण्यात आले.
राजसत्तेमधील वतनदारांनी हय़ा सगळय़ा उपक्रमांच्या संदर्भातील शेवटचा शब्द मात्र स्वत:कडे ठेवला! त्यामुळे रहाटीच्या देवळांपैकी कोणत्याही देवळांतील ग्रामदेवतांची पूजाअर्चा अथवा वार्षिक उत्सव साजरे करण्याच्या बाबतीत ‘राजसत्ता’ यजमानाच्या भूमिकेत वावरताना दिसते आणि तेथील प्रत्येक कार्य प्रत्यक्षात, पूर्वीच्या स्थानिक जमातींकडेच सोपविलेले असते. रहाटीच्या कार्यात यांच्या अधिकारांना काही मर्यादा आहेत. प्रत्यक्ष कार्यवाही करणे हा त्यांचा मान असला तरी, त्यात काही कारणामुळे खंड पडला तर पर्यायी व्यवस्था करण्याचा अधिकार मात्र राजसत्तेने (इतर घटकांची संमती घेऊन) स्वत:जवळ ठेवलेला दिसतो.
रहाटीने दिलेल्या अशा मानाची मर्यादा राखून पूर्वीच्या वस्तींमधील काही ठरावीक कर्त्यां जातींना राजसत्तेला जोडून पूर्व मर्यादेचा मान प्राप्त झाला. त्यामुळे गाव रहाटीमध्ये राजसत्ता आणि पूर्व मर्यादा अशा दोन स्वतंत्र शाखा निर्माण झाल्या आणि त्यांच्या सहकार्याने कालपरवापर्यंत गावगाडा चालू लागला.
अशा पूर्वमार्यादेमध्ये साधारणत: चार मानकऱ्यांचा समावेश दिसून येतो. मालवणी मुलखातील पूर्व मर्यादेमध्ये १) परब २) घाडी ३) गुरव आणि ४) महार असे चार मानकरी आहेत. या तपशिलात स्थलपरत्वे काही बदलही आहेत. उदा. परबांपैकी प्रभू मुळये (परब) आहेत ते राजसत्तेमध्ये अंतर्भूत आहेत.
रहाटीच्या मंदिरापैकी एक शिवमंदिर असते. स्थानपरत्वे त्यांची नावे श्री लिंगेश्वर, रामेश्वर, कलेश्वर अशी असली तरी ही सगळी शिवमंदिरे आहेत. यापैकी काही स्वयंभू आहेत.
त्या मंदिरांची व्यवस्था आणि पुजारीपणाचा मान, शाकाहारी लिंगायत, गुरव अथवा जैन कुटुंबाला दिलेला आहे, त्यामुळे पूर्व मर्यादेमध्ये, हा गुरव एक मानकरी समजला जातो.
परब हे पूर्वमर्यादेमधील ‘प्रभू’ असावेत. वतनदारांच्या पूर्वीच्या वस्तीमध्ये हय़ा परबांचे प्राबल्य असावे असे वाटते. मालवणी भाषेमध्ये जुनी माणसे परब न म्हणता ‘परभू’ असे म्हणत असत. त्यामुळे ‘प्रभू’चा ‘परभू’ झाला. आता त्याचे रूप परब असे झालेले दिसते.
घाडी हा पूर्व मर्यादेमधील एक घटक आहे. गाव रहाटीमधील देवदेवस्की, पूजापाठ, अवसर(अंगात येणे), कौल, प्रसाद हय़ा उपचारांत हय़ाचा मोठा सहभाग असतो.
राहाटीचे ‘गावमेळे’ बहुधा देवळात घेतले जातात. मात्र श्री लिंगेश्वराच्या (शिव) मंदिरात कसलीही गावबैठक घेतली जात नाही, असा संकेत आहे.
पूर्व मर्यादेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे महार. हा वर्ग या भूमीचा पहिला मालक समजला जातो. बारा बलुतेदारांना सुद्धा या रहाटीच्या कार्यात सामील करून घेतलेले आहे. हय़ापैकी प्रत्येकाचा छोटा मोठा सहभाग ग्रामसत्तेमध्ये आहे.
असे बारा बलुतेदार आणि १) राजसत्तेचा मानकरी २) परब ३) घाडी ४) गुरव आणि ५) महार अशा पाच मानकऱ्यांच्या कार्यकारिणीला ‘बारापाच’ असे म्हटलेले आहे. या घटकांमध्ये स्थल-कालपरत्वे तपशिलातील बदल संभवनीय आहे.

लोणी गाव
एक मराठ्याचे होते. बाकी सर्व येलमार होते. त्यांची जात फक्त आठ गावात आहे असे ते सांगत. सर्वच यलमार गळ्यात लिंग घालत नसत. रामोशी, महार, मांग, होलार यांची संख्या बरीच होती. सुताराचे व गवंड्याचे काम एक महारच करीत असे. शिवाय एक घर परटाचे होते. दोन न्हाव्यांची होती. एक सोनाराचे होते. एक कासाराचे होते.

मेघवंश समाज के पर्यायवाची नामों की राज्यवार तालिका
आंध्रप्रदेश – घासी, मादिगा, ऋषि, रिखिया, महार
अरुणाचल प्रदेश – ऋषि, मुची, महार
असम – मुचि, ऋषि, महार, बरुवा, पान
बिहार – घासी, घसीया, तांती, तन्तुवा, दुसाध, मुची
चंडीगढ़ – रामदासी, कबीरपंथी, जुलाहा, कोरी, कोली, मेघ
दादर नगर हवेली – मैघ्यावंशी, महार
दिल्ली – बलाई, रामदासिया, कबीरपंथी, कोली, मेघवाल
गुजरात – मेघवाल, मेघवार, मैह्यवंशी, भांबी, बंभी, रोहिदास, रोहित, बणकर, मारू
गोवा दमन दीव – मेघ्यावंशी, महार
हरियाणा – मेघ, मेघवाल, कोरी, कोली, महाशय, कबीरपंथी, जुलाहा, रामदासिया, बलाही, जाटव, जाटवा, भांबी
हिमाचल – मेघ, कोरी, कोली, महाशय, कबीरपंथी, जुलाहा, बलाही, जाटव, जाटवा, भांबी
जम्मू-कश्मीर – मेघ, कोरी, कबीरपंथी, जुलाहा, रामदासिया
कर्नाटक – मादिगा, सूर्यवंशी, पदमशाली, भांबी, भांभी, मदार, रोहिदास
केरल – वेल्लुवन, मुची
मध्यप्रदेश – मेघवाल, मेहरा, मेहर, महार, बलाई, भांबी, रामनामी, सतनामी, घासी, धानिया, कोरी, कोली
महाराष्ट्र – मेघ, मेघवाल, मेघवार, बलाई, भांबी, बंभी, सतनामी, सूर्यवंशी, घासी, घसिया, कोरी, मेहरा, मुची, मादिगा, मदार, महार, मेगु, मैह्यवंशी, कोरी
मणीपुर – मेघायल, ऋषि, मपची, रविदास
मिज़ोरम – ऋषि, मुची, कबीरपंथी, जुलाहा, महार
मेघालय – मुची, ऋषि, महार
ओड़िशा – सतनामी, मारू, घरसी, घसिया, कोरी, भापिग, मुची, मादिगा, महार, मेहरा
पांडिचेरी – मादिग, वेल्लुवन
पंजाब – मेघ, कोरी, कबीरपंथी, जुलाहा, रामदासी
राजस्थान – मेघ, मेघवाल, मेघवार, मेघवंश, मेघवंशी, मैह्यवंशी, बलाई, राजबलाई, भांबी, लाटवा, मारू, बणकर, बुनकर, कोरी, साल्वी, सूत्रकार, ऋषि, रिखिया, छड़ीदार, चोबदार, बैरवा, जाटव
तमिलनाडु – कोलियान, मादिगा, वेल्लुवन, मुची
त्रिपुरा – बागड़ी, घासी, घसिया, कोल, कोरी, कोरा, कोट, मुची
उत्तर प्रदेश – बलाई, बलाही, घसिया, कोल, कोरी, कोरवा, कोट, शिल्पकार, तंतुवाय, धूसिया, जूसिया, जाटव
पश्चिम बंगाल – मुची, ऋषि, घासी, म्हार

प्रवाशांचे सामान उचलणारा महार तो तराळ. करवसुलीसाठी शेतकऱ्यांना बोलावून आणणारा तो महारच. होळी पेटवायची ती महाराने. देवीची शांत करण्यासाठी रेडा बळी द्यायचा तो महाराने. रस्ते सफाई, मेलेली गुरे ओढून नेणे ही सुध्दा महाराची कामे. त्या गुरांची चामडी महारानेच घ्यायची. महारांची कामे लोकांनी पाळीपाळीने करायची असत. कामांबद्दल महारांना कसायला थोडी जमीन मिळे. तिला नाव हाडकी. घरपट्टी, गुरेपट्टी महारांना माफ. महारांची लग्न सराई आषाढात. का तर त्या महिन्यात सवर्णांची लग्ने होत नाहीत म्हणून महारांना जरा सवड असते. महार हा पाटलाचा “प्यून” . पण पाटलाची गादी गावचावडी आणि महाराला चावडीची पायरी चढता येत नाही म्हणून तेथे पाटलाची सेवा करण्यासाठी चौगुला हा पाटलाच्या जातीचा माणूसः